इंडोनेशियात जुन्या दारूगोळ्यांची विल्हेवाट लावताना स्फोट   

जकार्ता : इंडोनेशियातील पश्चिम जावा प्रांतात जुना निरुपयोगी दारूगोळ्याची विल्हेवाट लावताना झालेल्या स्फोटात चार सैनिकांसह १३ जणांचा मृत्यू झाला, लष्करी अधिकार्‍यांनी ही माहिती दिली.
 
दारूगोळा जुना झाल्यावर किंवा अयोग्यरित्या साठवला गेला, की तो कमी शक्तिशाली होतो. त्यामुळे वेळोवेळी त्याची विल्हेवाट लावावी लागते. इंडोनेशियन लष्कराचे सदस्य गरुत जिल्ह्यातील सेगारा गावातील पर्यावरण संरक्षण क्षेत्रातील लष्करी साठवण केंद्रात साठवलेल्या जुन्या, निरुपयोगी दारूगोळ्याची विल्हेवाट लावत होते.इंडोनेशियन लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल क्रिस्टोमी सियांटुरी यांनी सांगितले, की पहिल्या स्फोटानंतर लगेचच दुसरा स्फोट झाला. 

Related Articles